भारतातील पहिली हायब्रीड बाइक, कंपनीच्या दमदार फिचर्समुळे वाचेल पेट्रोल; किंमतही परवडणारी!

Yamaha FZ-S: भारतीय बाजारात लाँच करण्यात आलेली ही देशातील पहिली हायब्रिड मोटरसायकल असल्याचा दावा यामाहा कंपनीकडून करण्यात आलाय. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 11, 2025, 01:55 PM IST
भारतातील पहिली हायब्रीड बाइक, कंपनीच्या दमदार फिचर्समुळे वाचेल पेट्रोल; किंमतही परवडणारी!
यामाहा बाईक

Yamaha FZ-S: पुढच्या 5 वर्षांनंतर रस्त्यांवर पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या तुलनेत सीएनजी, इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात  दिसतील, असं सांगितलं जातं. त्यामुळे नव्या गाड्या घेणारे आतापासून सीएनजी किंवा इलेक्ट्रीक गाडीचा पर्याय अवलंबतात. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. बाईक उत्पादक कंपनी यामाहा इंडियाने देशातील पहिली हायब्रिड बाईक लाँच केली आहे. यामध्ये तुम्हाला दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात लाँच करण्यात आलेली ही देशातील पहिली हायब्रिड मोटरसायकल असल्याचा दावा यामाहा कंपनीकडून करण्यात आलाय. कंपनीने 2025 ची 'FZ-S Fi हायब्रिड' बाइक लॉंच केली आहे. ही बाईक 1.44 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीसह दिल्लीत लाँच करण्यात आली आहे. यााधी बजाजने देशातील पहिली सीएनजी बाईक लाँच केली होती. ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळतंय. सरकार इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यावर सतत लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात हायड्रोजन वायू, इथेनॉल आणि सीएनजीवर अधिक लक्ष केंद्रित केले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

2025 'एफझेड-एस फाय हायब्रिड'चे डिझाइन

FZ-S Fi हायब्रिडच्या डिझाइनबद्दल जाणून घेऊया. या बाईकची रचना जुन्या बाईकसारखीच आहे. बाईकच्या टँक कव्हरला तीक्ष्ण कडा आहेत. ज्यामुळे ती लूकच्या बाबतीत साऱ्यांनाच मागे टाकते. बाईकचा सिग्नेचर प्रेझेन्स छान आहे. बाईकच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये फ्रंट टर्न सिग्नल, एअर इनटेक एरियाचा समावेश आहे.

2025 च्या 'एफझेड-एस फाय हायब्रिड' ची पॉवर

या मोटरसायकलमध्ये 149 सीसी ब्लू कोर इंजिन आहे. जे OBD-2B अनुरूप आहे. यामध्ये यामाहाच्या स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) असून त्यात बॅटरी असिस्टेड अॅक्सिलरेशन मिळते. यासोबतच स्टॉप अँड स्टार्ट सिस्टमसाठी सपोर्ट देखील उपलब्ध देण्यात आले आहे. या फिचर्समुळे बाईकची इंधन कार्यक्षमता वाढते.

इतरही अनेक फिचर्स 

यामाहा कंपनीने आपल्या नवीन बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. यात 4.2-इंचाची पूर्ण रंगीत TFT इन्स्ट्रुमेंट स्क्रीन देण्यात आली आहे. ही टचस्क्रीन Y-कनेक्ट अॅपद्वारे स्मार्टफोनशी जोडता येते. यामध्ये ग्राहकांना टर्न बाय टर्न नेव्हिगेशन मिळते जे गुगल मॅपशी जोडलेले असते. यातून तुम्हाला रिअल टाइम दिशा, नेव्हिगेशन इंडेक्स, चौकाचे तपशील, रस्त्यांची नावे आणि इतर अनेक माहिती मिळू शकणार आहे. 

2 रंगांचे पर्याय 

बाइक चालवणाऱ्याचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी हँडलबार ऑप्टिमाइझ करण्यात आलाय. अधिक सुलभतेसाठी स्विचेस देण्यात आलेयत. तसेच रायडरला अधिक आराम मिळावा यासाठी हॉर्न स्विचची जागा बदलण्यात आलीय. इंधन टाकीला विमानासारखी इंधन कॅप देण्यात आलीय. ही बाईक रेसिंग ब्लू आणि सायन मेटॅलिक ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे.