Yamaha Motors ने भारतात एकाच वेळी केल्या चार मॉडेल्स लाँच! तरुणांसाठी खास पहिली इलेक्ट्रिक स्कूटर

Yamaha Launches: XSR155, FZ-RAVE, आणि पहिली इलेक्ट्रिक स्कूटर मालिका AEROX-E आणि EC-06 या यामाहा कंपनीने भारतात एकाचवेळी चार नवी मॉडेल्स लाँच केली आहेत. जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बॅटरी रेंजविषयी सविस्तर माहिती.  

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 12, 2025, 08:34 AM IST
Yamaha Motors ने भारतात एकाच वेळी केल्या चार मॉडेल्स लाँच! तरुणांसाठी खास पहिली इलेक्ट्रिक स्कूटर
Yamaha India Electric Vehicles 2025 full details inside

Yamaha Launches XSR155, FZ-RAVE, AEROX-E, and EC-06 in India: इंडिया यामाहा मोटर (IYM) प्रा. लि.ने भारतातील दोन आणि तीन चाकी वाहन क्षेत्रात नवा अध्याय सुरू करत एकाच वेळी चार मॉडेल्स लाँच केली आहेत. यात आधुनिक रेट्रो डिझाइन असलेली XSR155, कंपनीची पहिली दोन इलेक्ट्रिक वाहने AEROX-E आणि EC-06, तसेच तरुणांसाठी डिझाइन केलेली FZ-RAVE यांचा समावेश आहे. यामाहाने स्पष्ट केले की ही लाँचिंग केवळ उत्पादन विस्तार नसून, भारताच्या शाश्वत आणि प्रीमियम मोबिलिटी भविष्याकडे घेतलेले मोठे पाऊल आहे. यामाहा आपली उपस्थिती प्रीमियम आणि इलेक्ट्रिक सेगमेंट दोन्हीमध्ये मजबूत करत आहे.

Add Zee News as a Preferred Source

 XSR155 — आधुनिक रेट्रोचा उत्कृष्ट नमुना

नवीन XSR155 ही मोटरसायकल स्टाइल, क्लासिक डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचे उत्तम मिश्रण आहे. १५५ सीसी लिक्विड-कूल्ड, ४-व्हॉल्व्ह इंजिनसह ही बाइक १३.५ kW पॉवर आणि १४.२ Nm टॉर्क निर्माण करते. यात ६-स्पीड ट्रान्समिशन, असिस्ट-स्लिपर क्लच, अपसाइड-डाउन फोर्क्स आणि ड्युअल-चॅनेल ABS सारखी फीचर्स आहेत. ही मोटरसायकल Rs. 1,49,990 (एक्स-शोरूम, दिल्ली) या किंमतीत उपलब्ध आहे आणि मेटॅलिक ग्रे, विविड रेड, ग्रेईश ग्रीन आणि मेटॅलिक ब्ल्यू या चार आकर्षक रंगांमध्ये येते. याशिवाय, यामाहाने स्क्रॅम्बलर आणि कॅफे रेसर असे दोन अॅक्सेसरी पॅकेजेसही दिले आहेत.

 

AEROX-E – परफॉर्मन्ससह इलेक्ट्रिक क्रांती

यामाहाच्या प्रसिद्ध मॅक्सी स्पोर्ट्स स्कूटर सिरीजवर आधारित AEROX-E ही कंपनीची पहिली परफॉर्मन्स EV आहे. ९.४ kW पॉवर आणि ४८ Nm टॉर्क देणारी इलेक्ट्रिक मोटर, ड्युअल ३ kWh बॅटरी आणि १०६ किमीची रेंज या स्कूटरला वेग, स्टाइल आणि टिकाऊपणा देतात. तीन राइडिंग मोड्स (इको, स्टँडर्ड, पॉवर), ‘बूस्ट’ फंक्शन आणि रिव्हर्स मोडसह ही स्कूटर अत्याधुनिक फीचर्सने सजलेली आहे. टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह TFT डिस्प्ले आणि Y-कनेक्ट मोबाईल अॅपमुळे ही EV स्मार्ट आणि प्रीमियम दोन्ही वाटते.

 EC-06 – स्मार्ट आणि शाश्वत शहरी मोबिलिटी

शहरातील रोजच्या प्रवासासाठी डिझाइन केलेली EC-06 ही स्कूटर स्मार्ट, स्टायलिश आणि कार्यक्षम आहे. ४.५ kW मोटर आणि ४ kWh फिक्स बॅटरीसह ही स्कूटर १६० किमी रेंज देते. यात तीन राइडिंग मोड्स, रिव्हर्स फंक्शन आणि फास्ट चार्जिंगसाठी सोयीस्कर होम चार्जिंग सुविधा आहे. २४.५ लिटर स्टोरेज, एलईडी हेडलाइट्स, कलर LCD डिस्प्ले आणि सिमसह टेलिमॅटिक्स युनिट ही या स्कूटरची खास वैशिष्ट्ये आहेत.

 FZ-RAVE – तरुणांसाठी स्टायलिश आणि शक्तिशाली

FZ-RAVE ही मोटरसायकल यामाहाच्या लोकप्रिय FZ मालिकेचा पुढचा टप्पा आहे. १४९ सीसी एअर-कूल्ड इंजिन ९.१ kW पॉवर निर्माण करते. ५-स्पीड गिअरबॉक्स, सिंगल-चॅनेल ABS आणि दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक्स यामुळे ही बाइक सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. Rs. 1,17,218 (एक्स-शोरूम, दिल्ली) किंमतीत उपलब्ध असलेली ही बाइक मॅट टायटन आणि मेटॅलिक ब्लॅक या दोन रंगांमध्ये येते. तिचा LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, मसल फ्युएल टँक आणि एरोडायनॅमिक डिझाइन तरुण राइडर्सना आकर्षित करतो.

 

यामाहाचे मत

यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्यक्ष इतरू ओतानी म्हणाले “भारत आमच्या जागतिक विकास धोरणाचा केंद्रबिंदू आहे. XSR155, आमची नवीन EV रेंज आणि FZ-RAVE ही आमच्या प्रगतीची पुढची पायरी आहे. आम्ही भारतातील प्रीमियम आणि शाश्वत मोबिलिटी सेगमेंटमध्ये दीर्घकालीन नेतृत्वासाठी वचनबद्ध आहोत.”

FAQ

प्र. 1: यामाहाने भारतात कोणती नवीन वाहने लाँच केली आहेत?
उ. यामाहाने भारतात XSR155, FZ-RAVE, आणि त्यांची पहिली दोन इलेक्ट्रिक वाहने AEROX-E आणि EC-06 हे चार नवी मॉडेल्स लाँच केली आहेत  .

प्र. 2: XSR155 ची किंमत किती आहे?
उ. यामाहा XSR155 ची किंमत ₹1,49,990 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

प्र. 3: FZ-RAVE कोणत्या राइडर्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे?
उ. FZ-RAVE ही मोटरसायकल विशेषतः तरुण आणि डायनॅमिक राइडर्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यांना स्टायलिश आणि परफॉर्मन्स-केंद्रित बाईक हवी असते.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More