close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

या मराठी वाघीणीच्या, काम करण्याच्या वेगाचं सर्वांकडून कौतुक

मुंबईत मराठी माणूस उद्योग धंदे करण्यास लाजतो, किंवा उद्योगात मेहनत घेण्यास कचरतो, अशी वाक्य सहज कानावर पडतात. पण

Updated: May 23, 2019, 10:30 PM IST

मुंबई : मुंबईत मराठी माणूस उद्योग धंदे करण्यास लाजतो, किंवा उद्योगात मेहनत घेण्यास कचरतो, अशी वाक्य सहज कानावर पडतात. पण या फोटोत दिसत असलेल्या कविता यांनी हे सपशेल खोटं ठरवलं आहे. कविता हे दक्षिण मुंबईत चिंचपोकळी पूर्वेला चिंतामणी गणपतीपासून जवळच एका ठिकाणी आपला रगडा पाव पॅटीसचा गाडा चालवतात.

कविता या सायंकाळी ४ च्या सुमारास हा गाडा लावतात, तीन तास ते हा उद्योग करतात. पण यात तुम्ही त्यांच्या कामाचा वेग आणि तेथील स्वच्छता पाहून अवाक व्हाल. कविता यांनी बनवलेल्या पदार्थांची चव चाखल्यावर तर आणखी तुम्हाला येथे पुन्हा खायला यावंस वाटेल.

पण खालील व्हिडीओ कविता यांचं जगभरात कौतुक होत आहे. त्यांच्या कामाचा सपाटा पाहिल्यावर सर्वच जण त्यांचं कौतुक करतात. दररोज ३ तासाच्या या उद्योगात, त्यांच्या कामाचा वेग पाहण्यासारखा असतो, या दरम्यान पदार्थ बनवणे, ग्राहकांना देणे, या शिवाय सोबत पैशांची देवाण घेणाव हे देखील ते वेगाने करतात.