मुंबई : युट्युबने अलिकडेच सुमारे ५ मिलियन व्हिडिओज डिलीट केले आहेत. हे व्हिडिओज २०१७ च्या शेवटच्या तीन महिन्यात अपलोड केलेले आहेत. गुगल द्वारे अधिकृत व्हिडिओ शेअरिंग प्लेटफार्मने हे व्हिडिओज बघण्यापूर्वीच डिलीट केले. कंपनीने असे केल्याचे कारण म्हणजे अनुचित कंटेंट पोस्ट केल्यामुळे कंपनीला खूप काळापर्यंत टिकेला सामोरे जावे लागले होते.


कोणीही बघण्यापूर्वीच डिलीट केले गेले व्हिडिओज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युट्युबने एका रिपोर्टमधून सांगितले की, ८० लाखात ७६% व्हिडिओजला १ व्हिव्यू मिळण्यापूर्वी डिलीट करण्यात आले. यात अनुचित आणि हिंसक कंटेंट असल्याने कंपनीला हे पाऊल उचलावे लागले.


युट्युब गाईडलाईन्सचे उल्लंघन


युट्युबवर एकूण सुमारे ९३ लाख व्हिडिओज असे आहेत जे युट्युब गाईडलाईन्सचे उल्लंघन करत आहेत. यातील अधिकतर व्हिडिओज भारतात आहेत. या क्रमवारीत अमेरिका दुसऱ्या आणि युके सहाव्या स्थानावर आहे.


व्हिडिओजची तपासणी होत आहे


युट्युबने सांगितले की, सातत्याने व्हिडिओजची तपासणी केली जात आहे आणि नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडिओज रिमूव्ह करण्यात येत आहेत.


का डिलीट करण्यात आले व्हिडिओज?


युट्युबवर ३०० कंपन्या आणि संघटनांनी आपत्तीजनक कंटेंट सोबत त्यांच्या जाहिराती दिसत असल्याने तक्रार केली होती. यात एडिडास, अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स इत्यादींचा समावेश आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी व्हिडिओज रिमूव्ह करण्यात आले.