कॉल सेंटरचं फक्त नाव; सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली सुरू होतं लाजिरवाणं काम, अमेरिकी नागरिकांसोबत सुरू होता खेळ

Crime News : अंबरनाथमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश. सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांसोबत काय घडत होतं? पाच जणांना अटक  

सायली पाटील | Updated: Feb 25, 2026, 11:30 AM IST
कॉल सेंटरचं फक्त नाव; सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली सुरू होतं लाजिरवाणं काम, अमेरिकी नागरिकांसोबत सुरू होता खेळ
(छाया सौजन्य- एआय)/ ambarnath crime news fake call centre conned american citizens latest update

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : (Crime News) कॉल सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या अनेक चुकीच्या कामांचा खुलासा आजवरल गुन्हे आणि पोलीस शाखेनं केला असून याच कॉल सेंटरच्या कार्यवाहीवर लक्ष असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. ज्यामध्ये अंबरनाथमध्ये पोलिसांनी एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्याचं कळलं. या कॉल सेंटरमधून सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली लाजिरवाणं काम सुरू होतं. जिथं अमेरिकी नागरिकांना गंडा घातला जात होता. 

Add Zee News as a Preferred Source

हेसुद्धा वाचा : राष्ट्रवादीत नव्या अध्यक्षाची निवड कशी होते? कोण करतं मतदान? 

हजारो अमेरिकींना लुबाडलं...

कॉल सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या या फसवणुकीअंतर्गत हजारो अमेरिकी नागरिकांकडून कोट्यवधी रुपये लुबाडण्यात आल्याची शक्यता आहे. 'रुद्र टेक आयटी सर्व्हिस' असं या बनावट कॉल सेंटरचं नाव आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस सेंटरमध्ये तिसऱ्या माळ्यावर हे कॉल सेंटर सुरू होतं. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवसाला अमेरिकन नागरिकांना लुटण्याचं टार्गेट ठरवून दिलं जात होतं. त्यानुसार हे कर्मचारी अमेरिकन नागरिकांना कॉल करून वेबसाईट डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली संपर्क साधायचे आणि त्यांच्याकडून 100 ते 200 डॉलर ऍडव्हान्स मागवायचे. 

मागवण्यात आलेले हे पैसे ते बिट कॉईन अकाऊंटमध्ये जमा करायचे. तसंच एकदा पैसे आले, की त्या अमेरिकन नागरिकाला ब्लॉक केलं जायचं. अंदाजे या कॉल सेंटर मधून शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांना फोनवरून संपर्क साधला जायचा, त्यातील एखादा अमेरिकन नागरिक त्यांच्या जाळ्यात अडकायचा अशी या कॉल सेंटरची त्यांची मोडस होती. 

कॉल सेंटरचा बनाव रचत सुरू असणाऱ्या या प्रकरणाची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी मंगळवार (24 फेब्रुवारी 2026) रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास या कॉल सेंटरवर धाड टाकली. ही कारवाई बुधवारी सकाळी 7 वाजेपर्यंत सकाळपर्यंत सुरू होती. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटरमधले लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल फोन्स जप्त केले. तसंच अमेरिकी नागरिकांना गंडा घालणारा कॉल सेंटरचा मालक कमलेश सचवानी याच्यासह एकूण 5 जणांना बेड्या ठोकल्या. यात अजूनही काही जणांचा समावेश असुन याचा पोलीस तपास करत असून यात किती रुपयांचा व्यवहार झाला असल्याची माहिती पोलीस घेत आहेत. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More