महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! केंद्रबिंदू मुंबई नाही तर ठाण्यात, काँग्रेसचा 12 नगरसेवकांचा एक संपूर्ण गट भाजपमध्ये प्रवेश करणार

अंबरनाथमध्ये नाट्यमय घडामोडी घडली आहे. काँग्रेसचा 12 नगरसेवकांचा गट भाजपमध्ये जाणार आहे.  अंबरनाथमध्ये  शिवसेनेला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे.

वनिता कांबळे | Updated: Jan 7, 2026, 05:13 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! केंद्रबिंदू मुंबई नाही तर ठाण्यात, काँग्रेसचा 12 नगरसेवकांचा एक संपूर्ण गट भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Municipal Election : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.  याचा केंद्रबिंदू मुंबई नाही तर ठाण्यात आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये काँग्रेसचा 12 नगरसेवकांचा एक संपूर्ण गट भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.  अंबरनाथमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अंबरनाथमध्ये  शिवसेनेला धक्का! भाजप आणि काँग्रेस एकत्र

अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाला भाजपनं धक्का दिला आहे. शिवसेनेला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगरपरिषदेत एकत्र आल्यानं खळबळ उडाली आहे.  काँग्रेसच्या जोरावर भाजपा अंबरनाथ परिषदेत बहुमतात येणार आहे. तर यावर शिवसेनेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. ही युती शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यानंतरच आता आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. 

अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे आपल्या 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसनं 12 नगरसेवकांना निलंबित केल्यानंतर आता काँग्रेस नगरसेवकांनी भाजपप्रवेशाचा निर्णय घेतलाय. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना प्रदीप पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर गंभीर आरोप केलाय. ब्लॉक अध्यक्षपदासाठी सपकाळांनी एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माझ्याकडून ब्लॉक अध्यक्ष पदासाठी एक कोटीची केली मागणी असा आरोप प्रदीप पाटील यांनी केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना या युती संदर्भात आम्ही  सांगितलं होतं.  पैसे न दिल्याने ही कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आम्ही लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचे प्रदीप पाटील म्हणाले.  कारवाई अत्यंत चुकीची असल्याचेही ते म्हणाले.  काँग्रेसने निवडणुकीमध्ये एकदाही आम्हाला विचारलं नाही आम्ही आमच्या जोरावर निवडून आलो असंही ते म्हणाले. 

काँग्रेसकडून 12 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई

अंबरनाथ नगरपरिषदेत झालेल्या काँग्रेस आणि भाजपच्या युतीनंतर काँग्रेसकडून 12 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये. भाजपसोबत परस्पर युती केल्यानं नगरसेवकांवर ही कारवाई करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षासोबत शिस्तभंग केल्याचा ठपका या नगरसेवकांवर ठेवण्यात आलाय. 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More