महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा ठाण्यात घेण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली ती भाजपला टीका करत. आताच्या राजकारणात उमेदवारी मागे घेण्यासाठी कोट्याने पैसे दिले जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी मंचावर ज्योती यांना बोलावलं ज्यांनी पैसे नाकारले अन् आपली उमेदवारी कायम ठेवली. या मंचावर राज ठाकरे यांनी दोन व्यक्तींचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांनी ज्योती ताई यांचा उल्लेख केला.
सामान्य जनतेची ही शेवटची निवडणूक असेल. कारण यानंतर राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही. महापौर कोण होणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्ध ठाकरे म्हणाले की, एकत्र येत नव्हतो तेव्हा एकत्र कधी येणार असा सवाल केला जात होता. आता आलोय तरी देखील हाच प्रश्न विचारला जात आहे. पण आम्ही मराठी माणूस जागा करण्यासाठी आमची युती झालीय.
मराठी मराठी करताय इतर भाषिकांचं काय? आमच्या घरात जो दादागिरी करतोय त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं नाही तर का छत्रपतींचं राज्य कसलं? उभा चिरतील त्याला. सहनशील आहे सगळ्यांना आपलं मानत आलोय. पण आपलं आपलं करता त्यांना कानफटवलं तर काय होईल. गद्दार मुंबईचा गेलाय. मराठी माझी आई हिंदी माझी मावशी... आई मेली तरी चालेल. गद्दार लोकं महाराष्ट्रात कसे चालतात असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतो तो माणूस आता ठाण्याशी गद्दारी करतो, असं म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका केली. बावनकुळेंचा समाचार केला. मुख्यमंत्री असताना माझ्या काळात जेवढी जंगल वाढवली तेवढं काम कुणीच केलं नाही. गणेश नाईक यांनी बिबट्यांबाबत आदेश काढले की, 'शूट ऍट साईट'. पण जंगलाची जमिन जो कुणी सही करुन विकत आहे. त्याला 'शूट ऍट साईन' असं वनमंत्री गणेश नाईक करुन दाखवणार का? ही खेचाखेची सुरु आहे ती का खेचताय?
ठाण्यात बैलगाडीतून प्रचार केला जात असे. 2012 शेवटची महानगरपालिका झाली, ज्या सभेत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भाषणं केलं. आम्ही सांगत होतो सभा घेऊ नका पण दोनच घेणार असा शब्द बाळासाहेबांनी दिला. ते म्हणाले एक मुंबई आणि दुसरं माझं ठाणं या ठिकाणी सभा घेतली. बाळासाहेबांचं प्रेम ठाण्यावर होतं. भाषणाच्या वेळी एक चिठ्ठी आली त्यामध्ये लिहिलं होतं आमच्याकडे नाट्यगृह नाही. महापालिका द्या, नाट्यगृह दिलं. ... तसं काशिनाथ घाणेकर, गडकरी रंगायतन बांधून दिलं.
मिंदे सरकारने ठाण्यात पोस्टर लावले आहेत. ज्यामध्ये विकासाची नाही विनासाची गती आहे. कामं तत्परतेने मंजूर केलं जात आहे. मुलूंडच्या मेट्रोच्या इथे 100 ठिकाणी पर्यावरणाचा धोका निर्माण झाला. मुंबईत श्वास घेताना त्रास होतो. उद्या काही झालं तर ठाण्यातील गद्दार, आनंद दिघे बोलले होते ते जातील 5 स्टार शेतात हेलिकॉप्टरने, दुसरे जातील नागपूरला आणि तिसरे जातील काका मला वाचवा. आपण दोघेही फसलो आहोत. वचनाची पूर्तता पुस्तकात दाखवली आहे. कोस्टल रोड मुंबईकरांच्या पैशाने केलं आहे. त्यांनतर आपला दवाखाना ही योजना आखली. सरकार पाडलं अन् फित कापली. ठाण्यात साड्यांचं दुकान काढलं. ज्यांना कॉन्ट्र्क्ट दिलं पगार दिले नाही त्यामुळे बंद.
गंगाजल म्हणजे ठेवी. 92 हजार कोटीपर्यंत नेली. 70 हजार कोटी पर्यंत काढली. व्याजावर महापालिकेची अनेक काम होतं. पैसा परत कुठून येणार. मुंबईच्या डोक्यावर 3 कोटीचं कर्ज. तिजोरीत काय शिल्लक ठेवलंय की नाही. काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते की, बँकेत पैसे ठेवून विकास होत नाही. FD करुन फायदा नाही. देश अदानीच्या हातात द्यायचा. महापालिका भिकारी करायची. सगळे उद्योग गुजरातला गेले. ऑक्ट्रॉच्या निमित्ताने जो पैसा यायचा त्याची आवक बंद केली. मग आता महापालिका कशी चालवायची? मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दिल्लीतून पैसे यायचे नाहीत. महापालिकांचा खजिना खणून काढायचे. इंग्रजांनी जेवढं लुटलं नाही तेवढे भाजपवाले लुटत आहेत. नगरसेवक पदासाठी करोडे रुपये वाटतात. कुणाच्या खिशातून पैसा काढणार.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
OMA
(20 ov) 225/5
|
VS |
SL
120/9(20 ov)
|
| Sri Lanka beat Oman by 105 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SL
(20 ov) 225/5
|
VS |
OMA
120/9(20 ov)
|
| Sri Lanka beat Oman by 105 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 196/6
|
VS |
ENG
166(19 ov)
|
| West Indies beat England by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.