MIM alliance with BJP in Akot: अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषद एका वेगळ्या राजकीय समीकरणामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला आली आहे. अकोट नगरपरिषदेत भाजपाने आणि एमआयएमची युती झाल्याने कधीही न होणारे दोन पक्ष एकत्र कसे आले याचं आश्चर्य वाटत होतं. मात्र नंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना युतीसाठी जबाबदार धरत हात झटकले होते. पण त्यानंतही दुसऱ्यांदा युतीसाठी प्रयत्न झाला. यानंतर आता एमआयएमने संबंधित नगरसेवकांवर कारवाई केली आहे. एमआयएमने या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून, पाच जणांना पक्षातून हकालपट्टी केली आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपा आणि एमआयएम युतीचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला होता. मात्र स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीच्या माध्यमातून या युतीचा ‘पार्ट 2’ यशस्वी ठरल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी एमआयएमकडून भाजपाचे जिल्हा सदस्य आणि माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे सुपुत्र जितेन बरेठिया यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती आणि जितेन बरेठिया यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडण्यातही आले. या निर्णयामुळे एमआयएममधील काही नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली असून एका नगरसेविकेच्या पतीने थेट सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गट स्थापन करताना स्वीकृत गैर मुस्लिम उमेदवार न घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र ते पाळलं गेलं नाही असा आरोप नाराज नगरसेविकेच्या पतीने केला आहे.
दरम्यान भाजपाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जितेन बरेठिया यांचा भाजपाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत या प्रकरणापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या गटाकडून सुचविण्यात आलेल्या जितेन बरेठिया यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. या घडामोडींमुळे अकोट नगरपरिषदेत भाजप–एमआयएम युतीचा दुसरा टप्पा यशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे.
मात्र या प्रकरणात एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराला मदत केल्याचा ठपका ठेवत त्यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कृती पक्षविरोधी असल्याचं सांगत एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी पत्राद्वारे नोटीस बजावली आहे. तर संभाव्य स्वीकृत नगरसेवक उमेदवार ताज राणा यांनी व्हिडिओद्वारे या पाच नगरसेवकांवर विश्वासघाताचा आरोप करत त्यांना मदत न करण्याचं आवाहन केलं. तर पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली.
या सर्व घडामोडींवर अखेर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आपल्या जाहीर भाषणात संबंधित पाचही नगरसेवकांना पक्षातून निष्कासित केल्याची घोषणा केली आहे. मात्र अधिकृत पत्राद्वारे ही आदेश पारित करण्यात आलेले नाही.
अकोट नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीमुळे भाजप–एमआयएम युतीचा दुसरा टप्पा यशस्वी झाला आहे. मात्र या निर्णयामुळे एमआयएममध्येच नाराजी निर्माण झाली असून राजीनामे, नोटिसा आणि अखेर थेट निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे अकोटच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
WI
|
VS |
AFG
|
| Afghanistan beat West Indies by 23 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
|
VS |
AFG
|
| Afghanistan beat West Indies by 23 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
|
VS |
SCO
|
| Namibia beat Scotland by 6 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.