Video | अटकेत असलेला दहशतवादी काय म्हणाला; पाहा

Thu, 25 Aug 2022-9:40 am,

Terrorist arrest In Kashmir, Says Pakistani Colonel Gave 30,000 Rupees For Attack on Indian army घातपाती कारवायांसाठी पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या दहशतवाद्यानं पाकिस्तानचं बिंग फोडलंय.. भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी कर्नल युसूफ यानं 30 हजार रुपये दिल्याची कबुली या दहशतवाद्यानं दिलीये. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये या दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात आलंय. तबारक हुसैन असं त्याचं नाव आहे.. त्यांच्यासोबत आणखी 4 ते 5 दहशतवादी असल्याची माहिती त्यानं दिलीये.. भारतीय सैन्यावर ते आत्मघाती हल्ला करणार होते.. तबारक हा पाकव्याप्तत काश्मीरच्या सब्जकोट गावातील रहिवासी आहे. गेल्यावर्षी दोनवेळा त्याला बॉर्डर क्रॉस करताना अटक केली होती. तो पाकिस्तानी सैन्याचा गुप्तहेर म्हणूनही काम करतोय..

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link