रमीझ राजाला डच्चू

पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनी भारताला आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. पण यानंतर रमीज राजा यांना पीसीबीच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं.

Apr 10,2023

पीसीबीची वेगळी योजना

भारताने पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप स्पर्धेत खेळण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीने वेगळी योजना आखली आहे. एशिया कपमधले भारताचे सामने हे त्रयस्त ठिकाणी होतील, तर इतर सामने पाकिस्तानात खेळले जातील.

बीसीसीआयसमोर पीसीबी नमलं

पण आता पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी पलटी मारली आहे. भारतात होणारी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा ही आयसीसीची आहे. क्रिकेट प्रेमी ICC आणि ACC मध्ये गफलत करत आहेत, असं सेठी यांनी म्हटलंय.

बीसीसीआयची कठोर भूमिका

पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप स्पर्धेत टीम इंडिया खेळणार नाही हे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. यावर पीसीबीने आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती.

पीसीबीचा फूसका बार

पण पीसीबीची ही धमकी फुसका बार ठरला आहे. भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत संघ पाठवण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

पाकने दिली होती धमकी

भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ. पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही अशी ठोस भूमिका याआधीच बीसीसीआयने स्पष्ट केली आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती.

VIEW ALL

Read Next Story