फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्टने सुरु झाली होती शिखर धवनची लव्ह स्टोरी!

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

स्टार क्रिकेटर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि घरगुती सामन्यातून निवृत्ती घेतली. शिखरने एक व्हिडीओ पोस्ट करुन आपला प्रवास येथे थांबवक असल्याची माहिती दिली.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

धवनच्या खासगी आयुष्यात खूप उलथापालथ झाली. आयशा मुखर्जीसोबत त्याने लग्न केले.पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

सप्टेंबर 2021 मध्ये आयशा मुखर्जीने एक पोस्ट लिहून शिखरला घटस्फोट दिल्याचे जाहीर केले.2020 पासूनच दोघे वेगळे राहत होते.2023 ला कोर्टाने दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या आयशाला शिखरने हरभजन सिंहच्या फेसबुक फ्रेण्ड लिस्टमध्ये पाहिले होते. फोटो पाहून धवन तिच्या प्रेमात पडला.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

यानंतर धवनने तिला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली आणि दोघांमध्ये मैत्री झाली.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

फेसबुकवरच दोघांना प्रेम झाले. शिखर तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 2009 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि 2012 मध्ये लग्न केलं.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

शिखरचे पहिले तर आयशाचे दुसरे लग्न होते. आयशाचे पहिले लग्न ऑस्ट्रेलियातील एक बिझनसमनशी झाले होते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

तिला आधीच्या पतीपासू रेया आणि आलिया नावाच्या 2 मुली आहेत. तर शिखर आणि आयशाला जोरावर नावाचा एक मुलगा आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

मुलगा झाल्यानंतर दोघांच्या नात्यातील कटुता वाढू लागली. लग्नानंतर भारतातच राहीनं असं वचन तिने दिलं होतं पण तिने ते पाळलं नाही.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

VIEW ALL

Read Next Story