जन्म कुंडलीत चंद्र कमकुवत असल्यास काय परिणाम होतो ?

ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीला चांगले किंवा वाईट परिणाम मिळतात. असं म्हटलं जातं की, जन्म कुंडलीत चंद्र कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागतं.

ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत चंद्रबल कमकुवत असते अशा व्यक्ती मनाने अतिशय हळव्या असतात.

जन्म कुंडलीत चंद्र कमजोर असल्याने अशा व्यक्ती मानसिक नैराश्याने ग्रासलेल्या असतात. यांच्या नातेसंबंधात अनेक समस्या निर्माण होत असतात.

चंद्र हा आईशी संबंधित नातं दर्शवतो. जर चंद्रबल कमी असेल तर मातृतुल्य किंवा आईशी असलेले नातेसंबंध तितकेसे चांगले राहत नाही.

पत्रिकेतील कमकुवत चंद्र हा तुमच्या शरीरावर तितकाच वाईट परिणाम करतो. असं म्हटलं जातं की, चंद्रबल कमकुवत असल्याने सतत सर्दी होणं आणि डोकेदुखीचा त्रास होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, पत्रिकेत चंद्रबल कमकुवत असलेल्या व्यक्तीने उजव्या करंगळीत चांदीची अंगठी धारण करावी.

सोमवारी सकाळी महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक केल्यावर चंद्र मजबूत होतो. तसंच सोमवारी महादेवाची उपासना केल्याने पत्रिकेतील चंद्र सुधारण्यास मदत होते. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

VIEW ALL

Read Next Story