लिखाणाची आवड असेल तर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे हे 10 मोफत कोर्स एकदा पाहाच!


जर तुम्हाला लेखन करायची आवड असेल, क्रिएटीव्ह राईटींग या क्षेत्रात रुची असेल, तर हे खास कोर्स तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. कोणत्याही प्रकारचे लेखन करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी येथे सांगितलेले ऑनलाईन अभ्यासक्रम नक्कीच उपयोगी ठरतील.


हे कोर्स ऑक्सफोर्डमार्फत आयोजित केले जात आहेत. वास्तविकपासुन, काल्पनिकपर्यंत सर्व प्रकारच्या लिखाणासंदर्भात मार्गदर्शन देणारे कोर्स यात समाविष्ट आहेत. या आभ्यासक्रमांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या अभ्यासक्रमांची यादी पुढीलप्रमाणे.

लर्न दु राईट फ्लॅश फिक्शन

हा अभ्यासक्रम नवशिके आणि तज्ञ या दोघांसाठी उपलब्ध आहे. फ्लश फिक्शन हा फिक्शन म्हणजेच काल्पनिक लेखनाचाच प्रकार असून, यात छोट्या छोट्या कथांचा समावेश असतो. काही शे शब्दात लिहिलेल्या काल्पनिक गोष्टी यात असतात. अशा प्रकारच्या लिखाणात रस असणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम खुला आहे. 1 आणि 2 नोव्हेंबर ला दुपारी 2 ते 5 च्या वेळेत हा अभ्यासक्रम ऑनलाईन स्वरुपात घेतला जाईल.

अॅडव्हान्स क्रिएटीव्ह राईटींग

हा अभ्यासक्रम 8 जानेवारी ते 21 मार्च 2025 या कालावधीत घेतला जाणार आहे. ज्यांना कादंबरी लेखनाची आवड आहे, त्यांनी नक्कीच या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा. पात्र लिहिण्यापासुन कथा रंगवणे आणि शेवट आशा सर्व कादंबरीच्या घटकांचा अभ्यास यात आहे.

ट्रोलोप, डिकन्स अॅन्ड हार्डी, अॅन्ड एलियट: रिडींग व्हिक्टोरियन फिक्शन

या अभ्यासक्रमात व्हिक्टोरियन साहित्याचा अभ्यास आहे. यात काही 19व्या शतकातील दिग्गज नामवंत लेखकांनी लिहीलेल्या साहित्याबद्दल शिकवले जाईल. 8 जानेवारी ते 21 मार्च 2025 च्या दरम्यान अभ्यासक्रम ऑनलाईन शिकता येईल.

राईटींग लाईव्हस्

या प्रकारच्या लेखनात अनुभव, सत्य घटनांवर आधारित बाबींचे साहित्यात रुपांतर केले जाते. हे लेखन करतातना त्यातील तथ्याला धक्का न लावता सत्य परिस्थिती मांडण्यासाठी काय करावे? हे या अभ्यासक्रमात सांगितले जाईल. 8 जानेवारी ते 21 मार्च या काळात हा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कंटेंप्ररी ब्रिटीश फिक्शन

हा अभ्यासक्रम अशा लोकांसाठी आहे, ज्यांना कादंबरी वाचून त्याविषयी सल्लामसलत करायला, वाचक गटांमध्ये जायला, काल्पनिक लिखाणावर मत मांडायला, टिप्पणी करायला आवडते. 13 जानेवारी ते 28 मार्च 2025 या कालावधीत हा कोर्स आयोजिलेला आहे.

क्रिटीकल रिडींग

क्रिटीकल वाचक-लेखक दुसऱ्यांचे साहित्य एकदम बारकाईने वाचतात आणि त्यावर टिप्पण्या करतात. ऐकायला सोपं वाटलं, तरी हे काम कठीण आहे. त्यामुळे योग्य शिक्षण घेणे गरजेचे असते. 13 जानेवारी पासुन 28 मार्च 2025 पर्यंत हा अभ्यासक्रम ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध होईल.

गेटींग स्टार्टेड इन क्रिएटीव्ह राईटींग

13 जानेवारी ते 28 मार्च 2025 या दरम्यान या अभ्यासक्रमाचा लाभ घेता येईल. या कोर्समध्ये लिखाण कसे करावे, या विषयी संपुर्ण माहिती दिली जाणार आहे. सर्व प्रकारच्या लेखन पद्धतींविषयी यात माहिती दिली जाईल. लेखनात रस असणाऱ्या सर्वांनीच या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा.

VIEW ALL

Read Next Story