66 वर्षांच्या नीना गुप्ता झाल्या ट्रोल; धाडसी उत्तर देत नेटकऱ्यांना दिले चोख प्रत्युत्तर

Published by: Intern | Aug 21, 2025

बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता नेहमीच मनमोकळेपणाने जगतात. त्यांच्या धाडसी आणि बेधडक स्वभावामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Published by: Intern | Aug 21, 2025

नुकतेच पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आले, मात्र यावेळी त्यांनी ट्रोलर्सना थेट उत्तर देत शाळा घेतली.

Published by: Intern | Aug 21, 2025

नीना यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्या विमानतळाच्या वेटिंग लाउंजमध्ये बसलेल्या दिसतात. त्यांनी काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता.

Published by: Intern | Aug 21, 2025

व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिले - 'शॉर्ट ड्रेस वाली देसी गर्ल'. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.

Published by: Intern | Aug 21, 2025

एका नेटकऱ्याने कमेंट केली - 'मी तुम्हाला विनंती करतो की तुमचे पाय दाखवू नका. ते नीट टोन्ड नाहीत.' तर दुसऱ्याने लिहिले - 'तुमचे पाय माझ्या हाताएवढे आहेत. काहीतरी खात-पित जा.'

Published by: Intern | Aug 21, 2025

आणखी एका नेटकऱ्याने म्हटले - 'नीना जी, तुम्ही साडीतच सर्वात सुंदर दिसता.' काहींनी तर चेष्टेत लिहिले - 'आमच्या आजीला आम्ही कधीच असे कपडे घालताना पाहिले नाही.'

Published by: Intern | Aug 21, 2025

या सर्वांवर प्रतिक्रिया देताना नीना गुप्ता म्हणाल्या - 'काळजी करू नका. असे बोलणारे लोक फक्त हेवा करतात कारण त्यांच्याकडे असे शरीर नाही. कृपया त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.'

Published by: Intern | Aug 21, 2025

नीना यांच्या या स्पष्ट आणि धाडसी उत्तरामुळे ट्रोलर्सची तोंडे बंद झाली असून, तिच्या चाहत्यांनी तिच्या आत्मविश्वासाचे आणि बिनधास्तपणाचे भरभरून कौतुक केले आहे.

Published by: Intern | Aug 21, 2025

VIEW ALL

Read Next Story