अभिनेता हृतिक रोशन हा सध्या त्याच्या आगामी 'वॉर-2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
'वॉर-2' हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत ज्युनियर एनटीआर सुद्धा झळकणार आहे.
हृतिक असे म्हणतो,'कहो ना प्यार है' प्रमाणेच 'वॉर-2' हा चित्रपटही कायम लोकांच्या हृदयात राहील.
तसेच 'चित्रपटगृहात 'वॉर-2' पाहिल्यानंतर लोक ते विसरू शकणार नाहीत'.
पुढे हृतिक रोशन असे म्हणाला, "वॉरमध्ये कबीरची भूमिका केल्याबद्दल मला मिळालेले प्रेम मला 'कहो ना प्यार है', 'धूम 2' आणि 'क्रिश'ची आठवण करून देते.
'वॉर-2' या चित्रपटाच्या शूटिंग आधी हृतिकला 2 मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत.
'वॉर-2' हा YRF स्पाय युनिव्हर्सचा सहावा चित्रपट आहे. यातील बहुतेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत.
या चित्रपटात 'कियारा अडवाणी' आणि 'ज्युनियर एनटीआर' यांच्या एन्ट्रीमुळे हा चित्रपट अधिक दमदार झाला आहे.