I.N.D.I.A च्या बैठकीसाठी आलेले चढ्ढा अचानक परिणितीच्या भेटीला गेले अन्...

मुंबईमध्ये राजकीय नेत्यांच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी आलेले राघव चढ्ढा अचानक स्टुडिओत गेले.

ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये होणार बैठक

आज मुंबईमध्ये I.N.D.I.A आघाडीची तिसरी बैठक होणार आहे. 30 ऑक्टोबर आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे.

60 हून अधिक नेते

सत्ताधारी मोदी सरकारविरोध स्थापन केलेल्या या आघाडीच्या बैठकीत 60 हून अधिक नेते सहभागी होणार आहेत.

अरविंद केजरीवालही हजर राहणार

या बैठकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही हजेरी लावणार आहेत.

भगवंत मानही राहणार उपस्थित

आपचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आपचे एकूण 4 नेते INDIA बैठकीत

याशिवाय आपचे निलंबित खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढाही या बैठकीसाठी मुंबईत आले आहेत.

होणाऱ्या पत्नीला भेटले

मात्र राजकीय बैठकीसाठी मुंबई आलेल्या राघव चढ्ढा यांना होणाऱ्या पत्नीला भेटण्याचा मोह टाळता आला नाही.

सेटवर जाऊन परिणितीला भेटले

राघव चढ्ढा हे I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आल्यानंतर होणारी पत्नी म्हणजेच अभिनेत्री परिणिती चोप्राला सेटवर जाऊन भेटून आले.

जाहिरातीचं शुटींग असतानाच भेटीसाठी पोहोचले

वांद्रे येथील मेहबूब स्टुडीओमध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रा एका जाहिरातीचं शुटींग करत असतानाच राघव चढ्ढा तिला भेटण्यासाठी अचानकच पोहोचले.

मे महिन्यात झाला साखरपुडा

मे महिन्यामध्ये राघव चढ्ढा आणि परिणीतीचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर ते मध्यंतरी महाकालेश्वर मंदिरामध्ये देवदर्शनासाठीही गेले होते.

VIEW ALL

Read Next Story