लोकप्रिय टीव्ही अभिनेता नकुल मेहताने आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
नकुलने सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
मुलगा सुफीसोबतच्या आपल्या नवजात मुलीची झलक दाखवत नकुलने कॅप्शनमध्ये, 'ती आली आहे... सुफीला अखेर त्याची रूमी मिळाली. आम्ही फार भावूक झालो आहोत... 15 ऑगस्ट 2025,' यासोबत त्याने एका गाण्याच्या काही ओळीही पोस्टमध्ये लिहिल्यात.
एका फोटोत नकुल आपल्या मुलीकडे प्रेमाने पाहताना दिसतो. तर दुसऱ्या फोटोत नकुल आणि जानकी ऑपरेशन थिएटरमध्ये एकत्र आनंदाने हसताना दिसतात.
दोघांच्या चेहऱ्यावरील आनंदावरून त्यांच्या कुटुंबातल्या या नवीन चिमुकलीच्या आगमनाचा उत्साह स्पष्ट दिसत आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीही दोघांचे अभिनंदन केले आहे.
जानकी पारेख बराच काळ पडद्यापासून दूर आहे, तर नकुल सोशल मीडियावर सक्रिय राहून आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत असतो.