भैरवीच्या लग्नाच्या निमित्तानं लिमये यांच्या कुटुंबाची झलकही चाहत्यांना पाहायला मिळाली.
लेक दुरावणार हे दु:ख मात्र त्यांच्या मनात होतंच. वडिलांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे असणाऱ्या याच भावना सोशल मीडियावरील फोटोंध्ये पाहायला मिळाल्या.
लिमयेंची मुलगी भैरवी हिनं पुण्यातील सोहम शिंदे याच्यासह लग्नगाठ बांधली. या विवाहसोहळ्यात वधुचे बाबा प्रचंड आनंदात होते.
पत्नीसह त्यांनी जेव्हा मुलीला पहिल्यांदाच वधुरूपात पाहिलं तेव्हा ते भावूकही झाले.
उपेंद्र लिमयेसुद्धा याला अपवाद ठरले नाहीत. लेकीला वधुरूपात पाहून ते भारावले.
कोणत्याही वडिलांसाठी त्यांच्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी जाणं ही मोठी बाब असते. तिथं दगडासारखं काळीज असणारे वडीलही लहान मुलासारखे रडू लागतात.