'रामायण'च्या शूटिंगपूर्वी अभिनेता यशने घेतले महादेवाचे दर्शन; म्हणतो, 'मी लहानपणापासूनच...'

Published by: Zee Team | Apr 22, 2025

दक्षिणात्य सुपरस्टार यश सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 'केजीएफ 2' नंतर तो 'टॉक्सिक' चित्रपटातून कमबॅक करणार आहे.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

'टॉक्सिक' चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे आणि यश आता 'रामायण' चित्रपटाच्या तयारीत आहे.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

यश या आठवड्यापासूनच 'रामायण' चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. मात्र, या शुभप्रसंगापूर्वी त्याने आध्यात्मिक मार्ग निवडला आणि उज्जैनला जाऊन महाकालेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेतले.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

मंदिरात त्याने विधिवत पूजा केली आहे. या मंदिरातील त्याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

यशने दर्शनानंतर सांगितले, 'मी खूप आनंदी आहे. लहानपणापासून मी महादेवाचा भक्त आहे आणि मला त्यांच्या आशीर्वादाची नेहमीच गरज वाटते.'

Published by: Zee Team | Apr 22, 2025

'आमच्या घराचे कुलदैवतसुद्धा महादेवच आहेत. मी जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यात बसलो होतो, तेव्हा वेळ कसा गेला तेच समजले नाही,' अशीही भावना त्याने व्यक्त केली.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

विशेष म्हणजे, यश हिंदी भाषेत सहज संवाद साधताना दिसला. त्यामुळे त्याचे हिंदी चाहते खूप खुश झाले आहेत. सोशल मीडियावर त्याच्या हिंदी बोलण्याचेही भरपूर कौतुक होत आहे.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

VIEW ALL

Read Next Story