प्राजक्ता माळीसोबत रोमँटिक फोटोशूट करणारा 'तो' तरुण कोण?

Soneshwar Patil
Mar 30,2025


अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या हटके लूक आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.


प्राजक्ता कोणासोबत लग्न करणार? तिचा क्रश कोण आहे? अशा नेहमी सोशल मीडियावर चर्चा रंगत असतात.


दरम्यान, अशातच आता प्राजक्ता माळीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.


ज्यामध्ये तिने एका तरुणासोबत रोमँटिक फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो युरोपमधील आहेत.


या फोटोंना तिने 'युरोपच्या गल्यांमध्ये रोमँटिक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा असं कॅप्शन दिलं आहे.


अभिनेत्रीचे हे फोटोशूट 2019 मधील असून सध्या ते चर्चेत आलं आहे. प्राजक्तासोबत असणाऱ्या या तरुणाचे नाव अलोक भदाणे असं आहे.

VIEW ALL

Read Next Story