अभिनेत्री ऐश्वर्या रायकडे आहेत या टॉप ५ सर्वात महागड्या वस्तू

सँक्च्युरी फॉल्समध्ये व्हिला

होम ट्रँगलनुसार, ऐश्वर्या आणि अभिषेकचा दुबईच्या जुमेराह गोल्फ इस्टेटमध्ये असलेल्या सँक्च्युरी फॉल्समध्ये व्हिला आहे. ज्याची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत 21 कोटी रुपयांचे दुसरं घर

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचे मुंबईत 21 कोटी रुपयांचे दुसरं घर आहे. ऐश्वर्या-अभिषेकचा मुंबईतील स्कायलार्क टॉवर्सच्या ३७व्या मजल्यावर फ्लॅटही आहे. पण सनटेक रिॲलिटीमध्ये ऐश्वर्या रायच्या मालकीचे घर 21 कोटी रुपये आहे. हे घर 5500 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे.

५३ कॅरेटची सॉलिटेअर जडलेली अंगठी

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची एंगेजमेंट न्यूयॉर्कमध्ये झाली. एंगेजमेंटमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला ५३ कॅरेटची सॉलिटेअर जडलेली अंगठी दिली होती. या अंगठीची किंमत अंदाजे 50 लाख रुपये आहे.

75 लाखाची साडी

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा विवाह २००७ साली झाला होता. लग्नात ऐश्वर्याने फॅशन डिझायनर नीता लुला यांनी डिझाइन केलेली साडी परिधान केली होती. तिच्या साडीच्या बॉर्डरवर गोल्ड वर्क आणि स्वारोवस्की क्रिस्टल वर्क केले होतं. या साडीची किंमत 75 लाख रुपये होती.

३.१२ कोटी रुपयांची बेंटले सीजीटी कार

ऐश्वर्या राय बच्चनकडे ३.१२ कोटी रुपयांची बेंटले सीजीटी कार आहे. एवढंच नाही तर ऐश्वर्या 2.35 कोटी रुपयांच्या मर्सिडीज बेंझ एस 500 ची मालकही आहे. ऐश्वर्या रायकडे 1.12 कोटी रुपयांची Audi 8L देखील आहे. आपली मुलगी आराध्याला शाळेत सोडण्यासाठी ऐश्वर्या अनेकदा या कारचा वापर करते.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सिल्वर स्क्रिनवर जरी क्वचितच दिसली असली तरीही ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

VIEW ALL

Read Next Story