'रानबाजार' फेम मराठी अभिनेत्री माधुरी पवार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने तिचे दुबईवारीचे फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
दुबईमध्ये अभिनेत्रीचा पारंपारिक लूक पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.
यावेळी तिने आपली भाषा, आपली माणसं आणि आपली संस्कृती हीच खरी श्रीमंती म्हणत दुबईतील श्रीमंतीचा अनुभव घेणे हे माझ्यासाठी भाग्याचं होतं असं म्हटलं आहे.
फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये दुबईच्या आधुनिक गगनचुंबी सौंदर्यात, नखशिखांत सजलेली मी असं म्हटलं आहे.
पायातील पाचही बोटांवर झळकणारे महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने जणू माझ्या मुळांचा गंध घेऊन आलेत.
या लखलखत्या नगरीतही माझी ओळख, माझी संस्कृती आणि माझा अभिमान तितकाच उजळून दिसतोय असं ती म्हणाली.
कंपाळी चंद्रकोर, हलकासा मेकअप आणि सोनेरी रंगाच्या साडीतील अभिनेत्रीचं सौंदर्य सध्या चर्चेत आलं आहे.