मराठी कलाविश्वातील मीरा जगन्नाथ हे प्रसिद्ध नाव आहे. मीरा जगन्नाथला देखील कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.
तू नवीन आहेस, तुला कुणी ओळखत नाही, त्यामुळे तुला हे करावं लागेल असं म्हणत तिने दोन वेळा आलेला अनुभव सांगितला आहे.
मीराला मेहनत करून यश मिळवायचे आहे. काम मिळवण्यासाठी शॉर्टकट तिला नको आहे असं तिने सांगितले.
एखादा चित्रपट आणि सीरीज मिळून काय साध्य होत नाही. एकदा मला भूमिका देतो म्हणत त्यानं माझा हात पकडण्याचा प्रत्यन केला.
तेव्हा मी सरळ त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर दोन वर्षे मी काही कामं केलं नाही.
या घटनांमुळे कलाकार तणावात जात आहेत. त्यामुळे आता ओळखीतून आलेल्या कामालाच मी प्राधान्य देते असं ती म्हणाली.