बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या वर्षानुवर्षे एकमेकांच्या प्रेमात आहेत. मात्र, अद्याप त्यांनी लग्न केलेले नाही.
या यादीत मुग्धा गोडसे आणि राहुल देव यांचे देखील नाव आहे. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राहत आहेत.
पण त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. त्यांचे नाते 12 वर्षांपासून सुरु आहे. अशातच अभिनेत्रीने खास फोटो शेअर केलेत.
ज्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. फोटोत दोघेही एका बेंचवर बसलेले दिसत आहेत.
हे फोटो शेअर करताना मुग्धा गोडसेने लिहिलं की, 12 वर्षे. चाहते दोघांच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
दोघांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर दोघेही एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून मित्र बनले.
त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. राहुल देवने 1998 मध्ये रीना देवशी लग्न केलं.
या लग्नापासून त्यांना सिद्धार्थ हा मुलगा झाला. मात्र, 2009 मध्ये रीना देव यांचे कर्करोगाने निधन झाले.