'कसौटी जिंदगी की 2' या मालिकेने खूप काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
या मालिकेत काम केलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
टीव्ही अभिनेत्री सोन्या अयोध्याचा घटस्फोट झाला आहे. ती पती हर्षपासून विभक्त झाली आहे.
तब्बल 5 वर्षांचा सोन्या अयोध्याचा संसार मोडला आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
वयाच्या 29 व्या वर्षी तिने पती हर्षपासून घटस्फोट घेतला आहे. रिपोर्टनुसार, दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे.
घटस्फोटानंतर दोघांनी एकमेकांसोबत असलेले फोटो देखील हटवले आहेत. परंतु, सोन्या अयोध्याने घटस्फोटावर कोणतेही भाष्य केलं नाही.