बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 23 जून 2024 रोजी प्रियकर झहीर इक्बालशी लग्न केलं.
लग्नानंतर अभिनेत्रीची ही पहिलीच होळी असून ती पहिली होळी एकटीच साजरी करताना दिसत आहे.
बॉलिवूडचे सर्व कलाकार होळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. अशातच आता सोनाक्षी सिन्हाने देखील होळीचे फोटो शेअर केले आहेत.
फोटोमध्ये सोनाक्षी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. कपाळावर लाल बिंदी देखील लावलेली आहे. तर चेहऱ्यावर लाल आणि पिवळा रंग आणि तिचे हातही गुलाबी रंगाने रंगलेले दिसत आहेत.
मात्र, फोटोत कुठेच पती झहीर इक्बाल दिसत नसल्यामुळे चाहत्यांनी तिना ट्रोल केलं आहे.
झहीर कुठे आहे? असं विचारणाऱ्या चाहत्याला तिनं उत्तर दिलं आहे. ती एका शूटिंगमध्ये असून झहीर मुंबईत असल्याचे तिने सांगितले.