सध्या प्रेक्षक बॉक्स ऑफिस ऐवजी ओटीटीवर चित्रपट पाहण्यास जास्त पसंती देताना दिसत आहेत.
कारण सध्या ओटीटीवर धमाकेदार चित्रपट आणि सीरीज प्रेक्षकांना घरबसल्या आणि आपल्या वेळेत पाहता येतात.
अशातच ओटीटीवरील सर्वात महागड्या अभिनेत्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घेऊयात सविस्तर
ओटीटीवर सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता अजय देवगन ठरला आहे.
अभिनेत्याने 'रुद्र'च्या 7 एपिसोडसाठी तब्बल 125 कोटी रुपये इतकी फी घेतली आहे.
यामध्ये प्रत्येक एपिसोडसाठी अजय देवगनने तब्बल 18 कोटी रुपये इतकी फी घेतली आहे.
अजय देवगन हा भारतात ओटीटीवर सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. रिपोर्टनुसार, अजय देवगनची संपत्ती 427 कोटी रुपये इतकी आहे.