'हाऊसफुल 5'च्या रिलीजआधीच अक्षय कुमारला बसला मोठा धक्का!

Intern
May 10,2025


अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपट 'हाऊसफुल 5' मुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे.


या चित्रपटाचं 'लाल परी' हे गाणं अलीकडेच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ते सोशल मीडियावर जोरदार व्हायरलही होत आहे.


चित्रपटाचा टीझर 30 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता.


मात्र, कॉपीराइटच्या अडचणीमुळे टीझर यूट्यूबवरून हटवण्यात आला आहे. ज्यामुळे प्रमोशनला अडथळा निर्माण झाला आहे


ही घटना अक्षय कुमारसाठी मोठा धक्का ठरली आहे. कारण टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये अपेक्षा निर्माण झाली होती.


टीझर हटवण्यात आल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


या चित्रपटात अक्षयसोबत संजय दत्त, नाना पाटेकर, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, फरदीन खान आणि जॅकलिन यांचा समावेश आहे.


'हाऊसफुल 5' हा बहुप्रतिक्षित चित्रपट 6 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.


टीझर हटवल्यानंतर निर्माते लवकरच नवीन प्रोमो किंवा अपडेट्स घेऊन येतील, अशी अपेक्षा आहे.

VIEW ALL

Read Next Story