अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत.

सोशल मीडियावर चर्चा

ते दोघंही आता विवाहबंध आहेत. ते आपले फोटोज सध्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकतेच त्यांनी जेजुरीचे दर्शन घेतले होते.

अक्षयाच्या पोस्टनं वेधलंय लक्ष

सध्या अक्षया देवधरच्या एका पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

सासूबाईंच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन

यावेळी तिनं तिच्या सासूबाईंचा वाढदिवस साजरा केला होता. त्याचे फोटोज आणि व्हिडीओज तिनं इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

सासूबाईंना कोणत्या नावानं मारते हाक

यावेळी तिनं स्टोरीही शेअर केली आहे ज्यात आपल्या सासूबाईंसोबतच दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिनं 'हॅप्पी बर्थडे सासूबाई' आणि 'हॅप्पी बर्थडे मामी' असं म्हटलं आहे व इमोजी शेअर केले आहेत. (Photo: Akshaya Deodhar Instagram)

अशा दिल्या शुभेच्छा

त्याचसोबत तिनं वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओही शेअर केला आहे. (Photo: Akshaya Deodhar Instagram)

गोड कॅप्शन

''तुझ्यासाठी काय लिहावं, देवाकडे काय मागावं, आमच्या आनंदातच स्वतःचा आनंद मानुन, आधीच आमचा आनंद मागितला आहेस..! माझ्या प्रिय आईस तिच्या हार्दिक कडून, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.'' असं कॅप्शनही दिले आहे. (Photo: Akshaya Deodhar Instagram)

VIEW ALL

Read Next Story