बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या नवनवीन लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या कोणत्याही नवीन लूकचे फोटो सोशल मीडियावर काही क्षणातच व्हायरल होतात.
आलिया साधे कपडेही स्टायलिश पद्धतीने कॅरी करते. नुकत्याच एका कार्यक्रमात तिने एक हटके आणि पारंपरिक लूक सादर केला.
आलियाने मुंबईत चालू असलेल्या व्हेव्ह समिटमध्ये उपस्थिती लावली. या कार्यक्रमात तिच्या मराठमोळ्या लूकने सगळ्यांची मनं जिंकली.
तिने गुलाबी आणि सोनेरी रंगाची नऊवारी साडी, पेस्टल रंगाचा ब्लाऊज आणि न्यूड मेकअपसह खास मराठमोळा अंदाज साकारला होता.
हातात गजरा आणि केसांचा आंबाडा घातलेला असल्याने तिचा लूक आणखी खुलून आला होता
या लूकसोबत तिने हिरव्या रंगाचे मोत्यांचे कानातले आणि पारंपरिक कोल्हापुरी पायताण देखील परिधान केली होती. यामुळे तिचा लूक पुर्णपणे मराठमोळा वाटू लागला.
आलियाने हे फोटोज तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिले, 'सिनेमापासून गेमिंगपर्यंत, कलाकुसर ते तंत्रज्ञानापर्यंत... आमची कथा, आमची प्रतिभा, आमची दृष्टी, नेतृत्व करण्यास सज्ज. #WAVESummit तुम्हाला माझा #महाराष्ट्रडे स्पेशल लूक कसा वाटला ते सांगा.'
सध्या आलिया भट्ट 'अल्फा' आणि 'लव्ह अँड वॉर' या आगामी चित्रपटांच्या तयारीत आहे