अल्लू अर्जुन भेटला महाराष्ट्राच्या 'पुष्पा'ला; खरा पुष्पा कोण, ओळखणंच अवघड!

Intern
Apr 22,2025


अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' चित्रपट आणि त्यातील त्याने साकारलेली व्यक्तिरेखा लोकांच्या मनात घर करून गेली आहे. आजही अनेक चाहते अल्लूला 'पुष्पा भाऊ' म्हणूनच ओळखतात.


डिसेंबर 2024 मध्ये 'पुष्पा 2' प्रदर्शित झाल्यानंतर अल्लू अर्जुनची क्रेझ आणखीनच वाढली. चित्रपटगृहात प्रेक्षक अक्षरशः पुष्पाच्या गेटअपमध्येच चित्रपट पाहायला जात होते.


महाराष्ट्रातील अजय मोहिते हा देखील अल्लू अर्जुनचा जबरदस्त चाहता आहे. तो स्वतःला 'महाराष्ट्राचा पुष्पा' म्हणवतो आणि पुष्पाच्या गेटअपमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.


विशेष म्हणजे अजयला अखेर अल्लू अर्जुनला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. त्याने ही खास भेट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यामध्ये दोघेही 'पुष्पा स्टाईल'मध्ये एकत्र फोटो काढताना दिसतात.

अजयचे भावनिक शब्द

'अजूनही विश्वास बसत नाही की हे खरंच घडलं. ज्या माणसाला मी फक्त पडद्यावर पाहिलं, ज्याची स्टाईल मी फॉलो केली, ज्याचे हावभाव मी रोज जगलो… आज मी त्याच अल्लू अर्जुन सरांसोबत उभा आहे.'

अजय पुढे म्हणाला:

'तो माझ्यासाठी फक्त सुपरस्टार नाही, तो माझं प्रेरणास्थान आहे. रोज मी 'पुष्पा' बनत होतो आणि मनात फक्त एकच विचार असायचा, काश, एकदा तरी मला त्याला प्रत्यक्ष पाहता आलं असतं.'


'त्या क्षणी माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी भावूक झालो होतो. पण त्याचं हास्य, त्याचं प्रेम, त्याची ऊर्जा… हे सगळं त्या क्षणाला अमूल्य बनवून गेलं. हा फोटो फक्त आठवण नाही, ही माझ्या स्वप्नपूर्तीची जिवंत साक्ष आहे.'

VIEW ALL

Read Next Story