न बोलता अमिताभ बच्चन बरंच काही बोलले... पाकिस्तानला ट्रोल केलेला हा भन्नाट Video पाहाच

Intern
May 15,2025


बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर खूप सक्रिय आहेत.


अलीकडे त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.


या व्हिडीओत एक अँकर भारत-पाकिस्तानमधील तणावाविषयी बातम्या देताना दिसते.


व्हिडीओसोबत बिग बींनी लिहिलं आहे की, 'गेल्या आठवड्यात पाकिस्तानींसाठी एकमेव चांगली बातमी म्हणजे विराट कोहली निवृत्त झाला.'


बिग बींनी या पोस्टसोबत एक हसणारा इमोजीही जोडला आहे.


या माध्यमातून त्यांनी काही न बोलताच पाकिस्तानची मजा घेतली.


विशेष म्हणजे, बच्चन आपल्या प्रत्येक एक्स पोस्टवर एक क्रमांक लिहीतात, पण या पोस्टवर त्यांनी कोणताही नंबर दिलेला नाही.


त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

VIEW ALL

Read Next Story