अमृता खालविलकरचा अनारकली लूक; सोशल मीडियावर ठरला चर्चेचा विषय

Intern
Apr 04,2025


मराठमोळी अभिनेत्री अमृता खालविलकर आपल्या नृत्यकलेमुळे नेहमीच चर्चेत राहते.


तिने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे.


अमृता सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि त्यावर तिचे फोटो तसेच व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.


नुकतेच अमृताने पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये तिचे काही सुंदर फोटो शेअर केले.


या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.


तिचा सहज, सुंदर आणि खास लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.


अमृताच्या 'वाजले की बारा' आणि 'चंद्रा' या गाण्यांना प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली.


'वाजले की बारा' गाण्यामुळे अमृता रातोरात प्रसिद्ध झाली आणि त्या गाण्याने तिच्या करिअरला मोठ्या उंचीवर पोहोचवले.


त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय आणि नृत्य कला सादर केली.

VIEW ALL

Read Next Story