अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगनिमित्त सेलिब्रिटी निघाले भूर्रssss

Published by: Zee Team | May 27, 2024

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधना अडकणार आहे. या जोडप्याचा दिमाखदार लग्नसोहळा जुलै महिन्यात पार पडणार आहे.

Published by: Zee Team | May 27, 2024

सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे या जोडप्यच्या दुसऱ्या प्री वेडिंग सोहळ्याची. 28 ते 30 मे दरम्यान हा सोहळा इटलीमध्ये पार पडणार आहे.

Published by: Zee Team | May 27, 2024

अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्यानिमित्त इटलीतील क्रूझवर दुसरा प्री-वेडिंग सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी रणबीर- आलियापासून सलमान खान आणि इतर कलाकार इटलीला रवाना झाले आहेत.

Published by: Zee Team | May 27, 2024

फक्त कलाकारच नव्हे, तर महेंद्र सिंह धोनीसुद्धा सहकुटुंब इटलीला रवाना झाला आहे. हळुहळू इतरही अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि उद्योजक या सोहळ्यासाठी इटलीला जाणार आहेत.

Published by: Zee Team | May 27, 2024

सध्या मुंबईतील विमानतळावर राधिका आणि अनंतच्याच प्री वेडिंगसाठी रवाना होणाऱ्या पाहुण्यांची ये-जा सुरु असून, आता आणखी कोणकोणते चेहरे इथं पाहायला मिळतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Published by: Zee Team | May 27, 2024

सूत्रांच्या माहितीनुसार अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी पॉप सिंगर शकिराची विशेष उपस्थिती असणार आहे. आता या चर्चा प्री वेडिंग सोहळ्याच्याच वेळी खऱ्या की खोट्या ते पाहायला मिळणार आहे.

Published by: Zee Team | May 27, 2024

अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील परफॉर्म करताना दिसणार आहेत.

Published by: Zee Team | May 27, 2024

VIEW ALL

Read Next Story