मसाबा-सत्यदीपच्या घरी चिमुकलीचं आगमन

Oct 13,2024


फॅशन डिझायनर व प्रसिद्ध अभिनेत्री मसाबा गुप्ता काही महिन्यांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती.


मसाबाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे आणि जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आजी झाल्या आहेत.


11 ऑक्टोबरला मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांच्या घरी लेकीचं आगमन झालं.


मसाबाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेकीचा पहिला फोटो शेअर करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे.


तिच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील कलाकारांनी कमेंट्स करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


मसाबाचं हे दुसरं लग्न आहे. आधी तिने मधु मंटेना सोबत लग्न केलं होतं. पण 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.


सत्यदीपचं ही हे दुसरं लग्न आहे. याआधी तो आदिती राव हैटरीचा नवरा होता पण ते 2013 मध्ये वेगळे झाले.


जवळपास दीड वर्षांपूर्वी मसाबा आणि सत्यदीप यांनी अगदी साधेपणाने लग्न केले.


या दोघांनी 18 एप्रिलला एक फोटो शेअर करत आपण प्रेग्नेंट असल्याची बातमी सगळ्यांना सांगितली होती.

VIEW ALL

Read Next Story