अभिनेता संजय दत्तच्या मुन्नाभाई MBBS या चित्रपटात सर्किट ही भूमिका साकारुन लोकप्रियता मिळवलेला अभिनेता म्हणून अर्शद वारसीला ओळखले जाते.

नम्र स्वभाव आणि उत्तम विनोदबुद्धीच्या जोरावर अशर्दने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

विशेष म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्शदच्या लेकानेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

सध्या अर्शदचा लेक सिनेसृष्टीत त्याची ओळख निर्माण करायचा प्रयत्न करत आहे.

अर्शदच्या मुलाचं नाव जेके वारसी आहे. त्याला छोटा सर्किट या नावाने सर्वत्र ओळखले जाते.

जेके वारसी हा 18 वर्षांचा आहे. अर्शद आणि जेके यांच्या चेहऱ्यात प्रचंड साम्य आहे.

सध्या सोशल मीडियावर अर्शद आणि जेके यांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. यात अनेकजण जेके हा अर्शदची झेरॉक्स कॉपी असल्याचे म्हणताना दिसतात.

अर्शद वारसीच्या लेकाने 2005 मध्ये 'सलाम नमस्ते' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले. त्यावेळी तो फक्त एक वर्षाचा होता.

VIEW ALL

Read Next Story