अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.
मालिकेसोबतच तिने बॉईज चित्रपटात देखील काम केलं असून तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.
अशातच आता अभिनेत्रीने तिचा नवीन लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्रीने साडीमध्ये फोटोशूट केलं असून वेगवेगळ्या पोज देखील दिल्या आहेत.
तिचे या साडीमधील सौंदर्य पाहून चाहते देखील तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
नुकताच तिचा धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
अभिनेत्रीने आई कुठे काय करते या मालिकेत अनघा ही व्यक्तिरेखा साकरली होती.
अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.