अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक

Dakshata Thasale
Jan 22,2024

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा

अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठपणेला अवघे काही तास उरले आहे. पौष शुक्ल द्वादशी तिशी, मृगशिरा नक्षत्र, अभिजित मुहूर्त आणि मेष लग्नमध्ये 84 सेकंदाच्या संजीवनी योगमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यामध्ये वीआयपी आणि वीवीआयपी व्यक्तींचा समावेश आहे. असं असताना बॉलिवूड कलाकार देखील अयोध्येत पोहोचले आहेत.


मुंबई एअरपोर्टवर अनेक कलाकार अयोध्येला जाताना स्पॉट झाले. अयोध्येला जातानाचा त्यांचा खास लूक यावेळी पाहायला मिळाला. कलाकार अगदी राम रंगात रंगलेले दिसले. यामध्ये रणबीर-आलिया आणि रोहित शेट्टींचा समावेश आहे.

राममय वातावरण

अशावेळी संपूर्ण अयोधा हजारो फूल आणि दिव्यांनी सजली आहे. सगळीकडेच फक्त राम आणि रामच अनुभवता येत आहे.

कतरिना-विक्की

विक्की कौशल आणि कतरिना कैफ पारंपरिक वेशात अयोध्येला निघाले. यावेळी कतरिनाने गोल्डन रंगाची साडी नेसली होती तर विक्की कौशलने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली होती.

आलिया-रणबीर

आलिया ब्लू शेडच्या साडीत दिसत आहे. तर त्याला मॅच होईल अशी शॉल कॅरी केलीय. तर रणबीर कपूरने सफेद रंगाचा कुर्ता आणि धोतर घातलं आहे. हा लूक अतिशय लक्षवेधी ठरला.

माधुरी-श्रीराम

माधुरी दीक्षितने यावेळी पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे तर त्याला कॉम्प्लिमेंट म्हणून गोल्डन फुल स्लिव्ह ब्लाऊज कॅरी केलाय. यावेळी डॉ.श्रीराम नेने यांनी मरुन रंगाची पठाणी घातली आहे.

आयुष्मान खुराना

आयुष्मान खुरानाने यावेळी गोल्डन रंगाची शेरवानी कॅरी केलं आहे.

जग्गू दादा

जॅकी श्रॉफने अतिशय साधा पेहराव केलाय. यावेळी सफेद रंगाचा कुर्ता, पजामा आणि भगव्या रंगाचा स्कार्फ गळ्यात घातला आहे. एवढंच नव्हे हातात मनीप्लांट कॅरी केलंय.

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने यावेळी सफेद रंगाचा प्रिंटेट शर्ट आणि डेनीम जिन्स कॅरी केलेली.

VIEW ALL

Read Next Story