सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरने हजेरी लावली. या सोहळ्यात त्यांच्या पारंपारिक लूकची प्रचंड चर्चा रंगली आहे.

या सोहळ्याला आलिया भट्टने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या साडीच्या पदरावर रामायणातील काही महत्त्वाच्या क्षणांचे नक्षीकाम करण्यात आलं होतं.

तर रणबीर कपूरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-लेहंगा परिधान केला होता. त्यावर त्याने कलाकुसर केलेली एक शाल परिधान केली आहे. त्यावर छान नक्षीकाम केले आहे.

आलियाची साडी तयार करण्यासाठी सुमारे १० दिवसांचा कालावधी लागला. तिच्या साडीची किंमत सुमारे ४५ हजार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पण तुम्हाला माहितीये का, आलियाच्या साडीपेक्षा रणबीर कपूरने परिधान केलेली शाल महाग असल्याची माहिती समोर आली आहे.

रणबीरने या कार्यक्रमात परिधान केलेली शाल ही पश्मीना प्रकारातील आहे. ही शाल हातमागावर विणलेली आहे.

रणबीरने घातलेली शाल आलियाच्या साडीपेक्षा खूपच महाग आहे. या एका शालीची किंमत सुमारे 1 लाख 07 हजार इतकी असल्याचे बोललं जात आहे.

VIEW ALL

Read Next Story