भारतात आजही आहेत 'या' 9 राजकन्या! सौंदर्याने व्हाल घायाळ, तर संपत्ती पाहून थक्क
बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री ही सांगलीची राजकन्या आहे. सांगलीचे राजे विजयसिंगराव माधवराव पटवर्धन यांची कन्या आहे. अभिनेत्रीची 40 कोटींच्या घरात संपत्ती आहे.
किरण राव एक भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शिका आहे. ती आदिती राव हैदरी सारख्या तेलंगणातील राजेशाही वानापर्थी कुटुंबाशी संबंधित आहे. आदिती आणि किरण हे चुलत बहिणी आहेत. संपत्ती जवळपास 146 करोड इतकी आहे.
अनन्या राजे सिंधिया ही मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची राजकुमारी आहे. ती ज्योतिरादित्य सिंधिया आणि प्रियदर्शनी राजे सिंधिया यांची कन्या आहे. ज्योतिरादित्य यांच्याकडे 379 कोटींची संपत्ती आहे.
सोहा अली खान पतौडी हरियाणाच्या प्रसिद्ध राजघराण्याशी संबंधित आहे. तिच्याकडे 166 कोटींची संपत्ती आहे.
अदिती राव हैदरी ही एक राजकुमारी आहे. तेलंगणाच्या राजघराण्याशी संबंधित आहे. 130 कोटींची संपत्तीची मालकीण आहे.
मोहना कुमारी सिंह या मध्य प्रदेशातील रीवा येथील राजघराण्यातील आहेत. तिचे वडील पुष्पराज सिंग हे रेवाच्या सध्याच्या बघेल घराण्याचे वंशज आहेत. 100-155 कोटींची मालकीण आहे.
भाजपची सदस्य दिया कुमारी जयपूर, राजस्थानची राजकुमारी आहे. त्या महाराजा सवाई भवानी सिंह आणि महाराणी पद्मिनी देवी यांच्या कन्या आहेत. यांची 199 कोटींची मालमत्ता आहे.
मनीषा कोइराला ही नेपाळच्या राजघराण्यातील आहे. बिशेश्वर प्रसाद यांची ती नात आहे. तिच्याकडे 99 कोटींची संपत्ती आहे.
सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या शाहू महाराज यांच्या वंशज आहे. तिचे वडील विजयसिंह घाटगे हे कागलमधील शाही कुटुंबातील आहेत. 11000 कोटींची संपत्तीची ती मालकीण आहे.