'तुला शोधलं नसतं तर...', अनुष्काच्या वाढदिवसाला विराटची खास इन्टाग्राम पोस्ट

अनुष्का शर्मा

बॉलिवूडची स्टार अभिनेत्री अनुष्का शर्मा आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.

सुपरस्टार अनुष्का

'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून पदार्पण करणारी अनुष्का आज सुपरस्टार आहे. पीके, बॅंड बाजा बारात, ए दिल है मुश्किल असे अनेक अनुष्काचे चित्रपट हिट झाले.

विराट - अनुष्का

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. अशातच पत्नीच्या बर्थडेला विराटने खास पोस्ट केली आहे.

अनुष्काचे फोटो

विराटने अनुष्काचे काही फोटो इन्टाग्रामवर शेअर केले अन् तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्याने भन्नाट कॅप्टन दिलंय.

वाढदिवसाच्या शुभेच्छा

जर मी तुला शोधलं नसतं तर मी पूर्णपणे हरवलो असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिये, असं विराट इन्टाग्राम पोस्टवर म्हणाला आहे.

खूप प्रेम

तू आमच्या जगाचा प्रकाश आहेस आणि आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, असंही विराट इन्टाग्राम पोस्टवर म्हणाला आहे.

VIEW ALL

Read Next Story