भाग्यश्रीने सलमान खानच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
आजही ती तिच्या अभिनयामुळे आणि साधेपणामुळे नेहमीचं चर्चेत असते.
तिचे अनेक बॉलिवूड कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
माधुरी दीक्षित हे त्यापैकीच एक खास नाव आहे.
अलीकडेच माधुरीने आपला 58वा वाढदिवस साजरा केला.
या निमित्ताने भाग्यश्रीने सोशल मीडियावर एक खास स्केच शेअर केलं.
तिने सांगितलं की हे स्केच तिने 1988 मध्ये, म्हणजे 37 वर्षांपूर्वी, काढलं होतं.
भाग्यश्रीने लिहिलं, 'माधुरी एक दशलक्ष डॉलर्सचं स्मितहास्य! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.'
भाग्यश्रीने पुढे असेही लिहिले, 'हे स्केच मी 1988 मध्ये बनवले होते. तेव्हा मला माहितही नव्हते की, आपली एक दिवस मैत्री होईल.'