अंबानींच्या लग्नात 'बिब्बोजान'चा शाही थाट, लाखोंची किंमत असलेल्या लेहेंग्यानं वेधलं लक्ष

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या रिसेप्शनमध्ये अदिती राव हैदरी सोन्यासारखी चमकताना दिसली.

सोनेरी चमकदार लेहेंग्यामध्ये अशी फॅशन फ्लाँट केली की सगळे तिच्याकडे बघतच राहिले.

अदिती राव हैदरी ने गोल्डन लेहेंगा-चोलीसोबत गोल्डन दुपट्टा, गोल्डन बॅग घेतली आहे.

अदिती राव हैदरीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अदिती राव हैदरीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने संजय लीला भन्साळीची सिरीज 'हीरामंडी' च्या अगोदर अनेक सिनेमा केलेत.

'पद्मावत', 'महा सुंदरम', 'मर्डर 3', 'रॉकस्टार', 'दिल्ली 6', 'भूमी', 'बॉस', 'सायको' अशा अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.

रिद्धी मेहरा यांनी हा लेहेंगा डिझाइन केलाय. तर या लेहेंग्याची किंमत ही साधारण 292,800 रुपये इतकी असल्याचं म्हटलं जातं.

VIEW ALL

Read Next Story