बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना प्रचंड संघर्षानंतर यश मिळालं.
असाच एक अभिनेता ज्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्याला फ्लॉप हिरो म्हणून ओळखू लागले.
आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलबद्दल सांगत आहेत. ज्याची खतरनाक व्हिलन म्हणून ओळख आहे.
2023 मध्ये त्यांचा 'Animal' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता.
या चित्रपटात बॉबी देओल देखील होता. बॉबी या चित्रपटात मध्यंतरानंतर दिसतो. चित्रपटात त्याने फक्त 15 मिनिटांची भूमिका केली आहे.
या भूमिकेसाठी अभिनेत्याने 4 कोटी रुपये घेतले. चित्रपटातील त्याची 'अबरार' ही भूमिका आयकॉनिक ठरली.