बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा आजही हिंदी चित्रपटसृष्टीवर दबदबा आहे. जगभरात सलमानचे करोडो चाहते आहेत.
पण एक चाहता असा जो नेहमी सलमान खानबरोबर असतो. या चाहत्याचं नाव आहे शेरा. सलमान खानचा खासगी बॉडिगार्ड.
शेराचं खरं नाव गुरमीत सिंह जॉली आहे. चाहत्यांपासून सांभाळण्याची आणि सलमानची 24 तास सुरक्षा करण्याचं काम शेरा करतो.
शेरा नेहमी ढाल बनून सलमानच्या रक्षणासाठी खंबीर असतो. आपल्याशिवाय सलमानची काळजी कोणी घेऊ शकत नाही असं शेरा एका मुलाखतीत म्हटला होता.
शेरा हा सलमान खानबरोबर तब्बल 29 वर्ष सावली सारखा आहे. अनेक कलाकारांनी आपले बॉडीगार्ड बदलले. पण शेरा आजही सलमानबरोबर आहे.
सोहेल खानने सलमानची ओळख शेराशी करुन दिली होती. त्यावेळी सोहेलने सलमानचा बॉडीगार्ड बनण्याविषयी शेराला विचारलं होतं.
तेव्हापासून शेरा सलमानसोबत आहे. शेरा म्हणतो 'मी सरदार, तो पठाण आहे. आमची जोडी जमली आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत सलमानची सेवा करेन असं शेरा म्हणतो.