फोटोवर चाहत्यांच्या कमेंट

साराच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या या धार्मिक भेटीचं कौतुक केलं आहे.

'मी फार भाग्यवान'

"मला फक्त आभार मानायचे आहेत. मी फार भाग्यवान आहे जे इथे येऊ शकले. तुझे फक्त आणि फक्त आभार बाबा केदारनाथ, जय भोलेनाथ"

'सर्व काही दिल्याबद्दल आभार'

"मला घडवल्याबद्दल आणि सर्व काही दिल्याबद्दल आभार. फार कमी नशीबवान लोकांना तुझं दर्शन मिळतं," असंही तिने म्हटलं आहे.

साराने व्यक्त केल्या भावना

साराने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "जेव्हा मी पहिल्यांदा केदारनाथला आले तेव्हा कॅमेराला घाबरत होते आणि आज कॅमेऱ्याशिवाय माझ्या आयुष्याचा विचार करु शकत नाही".

साराने मानले आभार

साराने शंकराचे आभार मानताना तेथील काही इतर फोटोही शेअर केले आहेत.

बर्फात गोठवणारी थंडी

सारा पोहोचली तेव्हा तिथे बर्फ पडत होता. यामुळे साराने आपला सर्व चेहरा झाकून घेतला होता.

इन्स्टाग्रामला शेअर केले फोटो

साराने इन्स्टाग्रामला केदारनाथमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती मनोभावे देवाचं दर्शन घेताना दिसत आहे.

पहिल्या चित्रपटाचं शुटिंग

साराच्या पहिल्या चित्रपटाचं सर्व शुटिंग केदारनाथमध्येच झालं होतं. यानंतर पहिल्यांदाच सारा केदारनाथला पोहोचले असून आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल देवाचे आभार मानले आहेत.

साराचं केदारनाथशी खास नातं

सारा अली खानचा पहिला चित्रपट 'केदारनाथ' असल्याने तिचं या जागेशी खास नातं आहे.

सारा अली खानने 'केदारनाथ'च्या दर्शनाला

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकतीच 'केदारनाथ'च्या दर्शनाला पोहोचली होती.

VIEW ALL

Read Next Story