तमन्नाने का मोडला किसिंगचा नियम?

तमन्ना भाटिया सध्या आपल्या अफेअरमुळे चर्चेत आहे. नुकतंच तिने विजय वर्मा आपल्याला डेट करत असल्याची कबुली दिली आहे. ही जोडी लवकरच 'Lust Stories 2' मध्ये दिसणार आहे.

तमन्नाने 18 वर्ष जुना नियम तोडला

या सीरिजमध्ये तमन्नाने आपला 18 वर्ष जुना एक नियम तोडला आहे. तो म्हणजे नो किसिंग पॉलिसीचा. सीरिजमध्ये तिने विजय वर्मासह रोमँटिक सीन दिला आहे.

'Lust Stories 2' मध्ये बोल्ड सीन

सीरीजच्या ट्रेलरमध्ये दोघांमध्ये काही बोल्ड सीन असल्याचं दिसत आहे. पण मग तमन्नाने फक्त आपल्या प्रियकरासाठी हा नियम तोडला का?

सीरिजमधील भूमिकेसाठी आनंदी

Film Companion ला दिलेल्या मुलाखतीत तमन्नाने सांगितलं की, सीरिजमधील आपल्या भूमिकेसाठी ती फार आनंदी होती. कारण तिला स्क्रीनवर फार कमी इंटिमेट सीन देण्यात आले होते.

किसिंग सीन का केला?

किसिंग सीन पाहिल्यानंतर प्रेक्षक फार वेगळ्या प्रकारे व्यक्त होतील असं तिला वाटायचं. त्यामुळेच तिने ऑनस्क्रीन किस न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यातून बाहेर पडणं प्रगती वाटत आहे.

सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे जग बदललंय

पण आता सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे जग फार बदललं आहे. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून आपल्याला स्वत:ला रोखण्याची इच्छा नाही.

फेमस होण्यासाठी ?

किसिंग सीन त्या कथेची मागणी होते. पण आता 18 वर्षांनी आपण फेमस होण्यासाठी असं काही करत नाही आहोत असं तिने स्पष्ट केलं आहे.

"फक्त प्रसिद्धीसाठी मी ऑनस्क्रीन किस करणार नाही"

अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, आपण करिअरमध्ये खूप सारे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यामुळे फक्त प्रसिद्धीसाठी मी ऑनस्क्रीन किस करणार नाही.

तमन्ना आणि विजयचं डेटिंग

तमन्ना आणि विजयचा लस्ट स्टोरीज हा पहिला एकत्रित प्रोजक्ट आहे.

'Lust Stories 2' च्या सेटवर भेट

'Lust Stories 2' च्या सेटवरच दोघंची भेट झाली आणि येथेच दोघांमधील प्रेम फुललं असं बोललं जात आहे.

VIEW ALL

Read Next Story