ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथ हे 90 च्या दशकामधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अलोकनाथ यांनी अनेक कौटुंबिक भूमिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
अलोकनाथ हे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 'संस्कारी बाबूजी' नावाने ओळखले जातात.
अलोकनाथ यांचा आज वाढदिवस. याचनिमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे 4 चित्रपट ज्यामुळे अलोकनाथ यांना 'संस्कारी बाबूजी' असं नाव पडलं.
अलोकनाथ यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी अनेक वर्ष रंगभूमीवर नाटकांमध्ये काम केलं.
नाटकांमध्ये जम बसल्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटांमधून ऑफर मिळू लागल्या. त्यांनी 'संस्कारी बाबूजी' म्हणून अनेक भूमिका अजरामर केल्या.
'मैंने प्यार किया' चित्रपटामधून सलमान खानने प्रमुख अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली.
1989 साली प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' चित्रपटाने चांगली कामगिरी केली. या चित्रपटात अलोकनाथ यांनी भाग्यश्रीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
'हम साथ साथ हैं' चित्रपटामधून अलोकनाथ आणि सलमान पुन्हा एकत्र दिसले. हा मल्टीस्टारर चित्रपट होता.
'हम साथ साथ हैं' चित्रपटामधील अलोकनाथ यांच्या भूमिकेने अनेकांची मनं जिंकली.
'हम आपके हैं कौन' चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला. हा चित्रटही चांगलाच गाजला. या चित्रपटाही अलोकनाथ होते.
अलोकनाथ यांनी या चित्रपटामध्ये सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये अनुपम खैर, रिमा लागूंबरोबर अलोकनाथ यांच्या भूमिकेचंही फार कौतुक झालं.
शाहिद कपूर आणि अमृता रावच्या 'विवाह' चित्रपटामध्येही अलोकनाथ झळकले. यामध्ये त्यांनी अमृताच्या काकांची भूमिका साकारली होती.
लहानपणीच पालकांना गमावलेल्या अमृताला अगदी मुलीप्रमाणे जीव लावणाऱ्या चुलत्याची अलोकनाथ यांनी साकारलेली भूमिका अनेकांना भूरळ पाडून गेली.