भान हरपणारं फोटोशूट

'एकदा जोडलेलं नातं...'; भान हरपणारं फोटोशूट, सत्तरीतल्या रेखा आणि प्रेमाच्या गोष्टी

Jul 04,2023

वोगच्या निमित्तानं गप्पा...

अशा या अभिनेत्रीनं जीवनातील अतिशय महत्त्वाच्या काळावर भाष्य करत काही रहस्य सर्वांसमोर आणली आहेत

रेखा आणि त्यांचं जगणं....

निमित्त होतं ते म्हणजे VOUGE या मासिकाला दिलेली मुलाखत आणि त्यांच्यासाठी केलेलं Vogue Arabia फोटोशूट.

रेखा आणि त्यांची अदा

हिंदी कलाजगतातील अतिशय गाजलेल्या फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये रेखा यांचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. यावेळी त्यांनी या सेलिब्रिटी डिझायनरचेही आभार मानले.

'वोग'

'वोग'च्या कव्हरसाठी शूट केलं असताना रेखा यांनी काही गोष्टींचा उलगडाही केला. ज्यामुळं त्यांच्या सिनेकारकिर्दीला जवळून पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली.

दोन दशकांनंतरची मुलाखत

जवळपास गेली दोन दशकं रेखा यांनी एकही मुलाखत दिली नाही. पण, आता एका मुलाखतीतून मात्र त्यांनी काही गोष्टी अधिक स्पष्टपणे सांगितल्या.

आठवणी

गेल्या 9 वर्षांपासून एकाही चित्रपटात न झळकण्याबाबतच्या प्रश्चानं उत्तर देत त्या म्हणाल्या, 'मी चित्रपट नाही केले तरीही ते माझा पाठलाग सोडत नाहीत. माझं ज्यांच्यावर प्रेम आहे ते पुन्हा जगण्यासाठी माझ्याकडे आठवणी आहेत.'

योग्य वेळ

योग्य वेळ येईल तेव्हा योग्य चित्रपट मलाच शोधत येईल, असं म्हणताना रेखा यांनी माझं व्यक्तिमत्त्वं हे माझंच आहे असंही स्पष्ट केलं.

निर्णयाचं स्वातंत्र्य

मला कुठे राहायचंय, कुठे नाही याचा निर्णय मी स्वत: घेतला आणि हे ठरवण्याचा अधिकार मला आहे हीच नशिबाची गोष्ट आहे, असं म्हणत त्यांनी जगण्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

प्रेमाविषयीही जरा स्पष्टच बोलल्या...

प्रेमाविषयीही जरा स्पष्टच बोलताना त्यांनी सांगितलं, 'एकदा जे नातं जोडलं जातं ते कायमस्वरुपी असतं. अनेकदा आपल्यालाच जास्त अपेक्षा असतात किंवा काही प्रसंगी आपण जे मिळतं त्यातच आनंदी असतो'. (सर्व छायाचित्र- वोग / Instagram)

VIEW ALL

Read Next Story