मुंबईत सर्वात महागडी घरं असलेले सेलिब्रिटी

मायानगरी मुंबई ही कलाकारांची, अभिनेत्यांचं शहर म्हणून ओळखली जाते. मुंबईत अनेक सेलिब्रिटी राहतात. त्यांच्यापैकी सर्वात महागडं घर असणारा सेलिब्रिटी कोणता हे पाहूयात...

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरचं जुहूमधील जेव्हीपीडी स्कीम येथे ट्रीपलेक्स घर आहे. हे घर 39 कोटींचं आहे.

शाहीद कपूर आणि मिरा कपूर

शाहीद कपूर आणि मिरा कपूर या दोघांचं वरळीमधील थ्री सिक्टी येथे एक ड्युपेक्स घर आहे. या घराची किंमत 56 कोटी इतकी आहे.

अजय देवगण आणि काजोल

अजय देवगण आणि काजोल ज्या शिवशक्ती बंगल्यात राहतात त्याची किंमत 60 कोटी रुपये इतकी आहे.

अक्षय कुमार

अक्षय कुमारचं जुहू येथील प्राइम बीचमधील ड्युलेक्स घर 80 कोटी रुपयांचं आहे.

ऋतिक रोशन

ऋतिकचं घर जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील एका आलिशान इमारतीत आहे. या इमारतीमधील पेंटहाऊसही रोशन कुंटाबाच्या मालकीचं असून त्याची एकूण किंमत 97 कोटी 50 लाख इतकी आहे.

अमिताभ बच्चन- जया बच्चन

अमिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबासहीत ज्या 'जलसा' बंगल्यात राहतात त्याचं मूल्य 100 कोटी रुपये इतकं आहे.

रणवीर सिंह-दीपिका पादुकोण

रणवीर सिंह, दीपिका पादुकोण या दोघांचं मुंबईत एक चार मजल्याचं आलिशान घर आहे. घरातून समुद्र दिसू शकतो असा व्ह्यू असलेल्या या घराची किंमत 119 कोटी रुपये इतकी आहे.

शाहरुख खान-गौरी खान

शाहरुख खान ज्या 'मन्नत' बंगल्यात आपल्या कुटुंबाबरोब राहतो त्याची किंमत सध्याच्या घडीला 200 कोटी इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story